। शिर्डी । दि.23 मे ।राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चला गोरगरिबांची चूल पेटवू या अभियान सुरू आहे. प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती राहाता तालुका यांच्या नेतृत्वाखाली नांदूखी खुर्दचे प्रहार शाखाअध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य विजय वाणी पा. यांच्या
आर्थिक नियोजनातून राहाता तालुक्यातील नांदूखी खुर्द व नांदूखी बु. या गावांतील मोलमजुरी करणाऱ्या महिला, निराधार, तसेच अत्यंत गरीब अशा तब्बल २०० कुटुंबाना भाजीपाला वितरण करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, राहाता तालुका उपाध्यक्ष विजय काकडे, संघटक वसंतराव काळे, समनव्यक जगणं सरोदे, राहाता तालुका दिव्यांग क्रांती उपाद्यक्ष नितीन भन्साळी, नांदुखी दिव्यांग शाखा अध्यक्ष विशाल दाभाडे उपस्थित होते.
