। अहमदनगर । दि.30 मे । कर्जत तालुक्याच्या विविध भागात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस झाला. झंझावाती वादळामुळे शेतकर्यांच्या पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक राहत्या घरावरील तसेच जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले. यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्याच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
चांदे बुद्रुक येथील कल्याण बापूराव सूर्यवंशी यांच्या राहत्या घराचे पत्रे उडाले. त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती भरत तुपे यांनी दिली. कुळधरण, कोपर्डी, रवळगाव, राशीन आदी भागात फळबागांचे मोठे नुकसान झाले. कित्येक झाडे उन्मळून पडली.
तोरकडवाडी येथील चांगदेव बाजीराव कानगुडे यांच्या अडीच एकर केळी पिकाची मोठी पडझड झाली आहे. या वादळाने त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.