मोटारसायकल स्वारांना मारहाण करून लुटले

। अहमदनगर  । दि.30 मे । मोटर सायकलवरून गायकवाड जळगाव कडे जाणार्‍या मोटरसायकलला अनोळखी इसमांनी लाथ मारून खाली पाडून काठीने मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम दागिने रोख रक्कम असा 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. ही घटना शेवगाव ते गायकवाड जळगाव रोड वरील चापडगावच्या पुढे हॉटेल कार्तिकी जवळ घडली.

राहुल अरुण खरात (वय.26 रा.कुदळवाडी चिखली) हा त्याच्या सासू सह मोटरसायकलवरून शेवगाव ते गायकवाड जळगाव रोडने जात असताना चापडगावच्या पुढे हॉटेल कार्तिकी जवळ मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी खरात यांच्या मोटरसायकलला लाथ मारून त्यांना खाली पाडले.

गुप्तीने व काठीने दोघांना मारहाण करून त्यांच्या सासूच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, व मोबाईल असा 1 लाख 45 हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला.ं याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी राहुल खरात यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post