। अहमदनगर । दि.27 मे । अवैध गावठी हातभट्टी, देशी दारु व ताडी, मुद्देमाल दि.26 रोजी भाऊ उर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे (वय 45, रा.घासगल्ली, भिंगार, ता.नगर) यांच्या ताब्यातुन मुद्देमाल विक्री करताना पकडले आहे.त्याच्याकडून 300 लिटर हातभट्टी दारु, 109 बाटल्या व 200 फुगे प्लास्टीक पिशवी असा एकुण 35 हजार 834 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
माहिती अशी की, कॅम्प पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी शिशिरकमार देशमूख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घासगल्ली भिंगार येथे एक इसम नावे भाऊ उर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे (रा.भिंगार) हा विनापरवाना गावठी हातभट्टी दारुची तसेच देशी दारु व ताडीची विक्री करत आहे.
या खात्रीशीर माहितीवरुन त्यांनी सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता त्याचे कब्जात 30 हजार रुपये किंमतीचे 300 लिटर गावठी हातभट्टीची दारु तसेच 2 हजार 834 रुपये किंमतीची देशी दारु बॉबी संत्री कंपनीच्या 109 बाटल्या व 3 हजार किंमतीचे ताडीचे 200 फुगे प्लास्टीक पिशवीत असा एकूण 35 हजार 834 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिंगारदिवे याला ताब्यात घेतल्यानंतर कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, सो,उप विभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांचे मार्गदर्शना खाली सपोनी शिशिरकुमार देशमुख, पोसई सचिन रणशेवरे पोहेकाँ गोविंद गोल्हार, पोहेकॉ व्ही.जी.धामणे पोना बी.जी.खेडकर, पोना अंबादास पालवे पोकॉ सचिन धोंडे, एस.बी. साळवे, चापोका अरूण मोरे, पोना हेमंत खंडागळे, पोकॉ सागर व्दारके, होमगार्ड देवीदास उमाप ,पांडुरंग गीते, प्रविण दांगडे, यांनी सदरची कारवाई केली आहे.
