। अहमदनगर । दि.31 मे । कोपरगाव येथील बेट भागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट जागेतील नगरपालिका शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 5 च्या इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गखोल्यांचे पत्रे वादळामुळे उडून लगतच्या मारुती मंदिर कळसाजवळ पडले.
ही घटना शनिवारी दुपारी 3.30 वाजता घडली. ही माहिती भाऊसाहेब शिंदे यांना तेथे खेळणार्या लहान मुलांकडून समजताच त्यांनी मुख्याध्यापक विलास माळी, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांना कळवली.
घोडके लगेच तेथे गेले. त्यांनी शाळेच्या छतावर जाऊन पहाणी केली. मंदिराच्या कळसालगत अडकलेले तातडीने काढण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली. तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी संबंधित यंत्रणेला पंचनामा व मदतकार्याबाबत कळवले.
योगेश तांगडे, मुख्याध्यापक माळी, नगरसेवक अनिल आव्हाड, आरोग्य निरीक्षक सुनील आरणे, संजय रोडे, दादासाहेब आव्हाड, गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे, दीपक शिंदे, दादासाहेब नाईकवाडे, शिक्षक सुनील रहाणे, न. पा. शिक्षण मंडळाचे प्रशांत शिंदे, राजेंद्र परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली.