। अहमदनगर । दि.30 मे । तोट्यात असलेल्या नगर अर्बन बँकेच्या कोपरगांव, शिर्डी, दौंड व चंदन नगर या चार शाखा बंद करण्याचा निर्णय घेवून बँकेचा तोटा भरुन काढण्याचे नियोजन केल्याबद्दल बँकेचे माजी चेअरमन अॅड.अशोक कोठारी यांनी बँकेच्या प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. या स्वरुपाची मागणी त्यांनी यापुर्वी केली होती.
विधायक, रचनात्मक विचारातून व सामुहिक प्रयत्नातून अर्बन बँकेस पुनःश्च वैभवशाली स्वरूप प्राप्त होण्यासाठी बँकेचे माजी सेवक, माजी सेवक, माजी संचालक, सहकार बँकिंग क्षेत्रातील निवृत्त तज्ञ अधिकारी, बँकेविषयी आस्था बाळगणा-या अनेक सभासद व खातेदारांशी संपर्क साधून केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे पत्रक अॅड.अशोक कोठारी यांनी काढले आहे.
राज्यातील अनेक बँकांवर आर्थिक संकटे आलीत मात्र सेवकांची संस्था निष्ठता, सामुहिक विधायक प्रयत्नातून या बँकांनी पुर्नवैभव प्राप्त झाल्याची अनेक उदाहरणे सांगून अॅड.कोठारी यांनी या बँकेमुळे आपणासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळून राज्यस्तरापर्यंत कार्य करण्याची संधी मिळाली त्याची कृतज्ञता म्हणून पुढाकार घेवून बँकेविरुद्ध होणार्या अपप्रचाराच्या प्रकारांना त्यांनी आळा घातला. नवीन कर्जदार मिळविणे, उत्पन्न वाढीचे प्रयत्न या विषयी बँकेच्या प्रशासनाचा सकारात्मक दृष्टीकोन निदर्शनास आल्याचे अँड.कोठारी यांनी सांगितले.