‘कुंभमेळाव्यातून शहरात येणाऱ्या भाविकांना १४ दिवस क्वॉरंन्टाइन करा’

। अहमदनगर । दि.20 एप्रिल । हरिद्वार येथे घेण्यात आलेल्या कुंभमेळाव्यातून कोरोना संक्रमणाचा भडक उडाला असल्याचे समोर आले आहे. यात अनेक आखाड्याचे साधू कोरोनाबाधित झाल. त्याचा शिरकाव तेथे गेलेल्या भाविकांमध्ये झाला आहे. महाराष्ट्रासह जिल्ह्याची गंभीर परिस्थिती पाहता कुंभमेळाव्यातून येणार्‍या भाविकांना १४ दिवस क्वॉरंन्टाईन करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली.

 


कुंभमेळाव्यातून आलेल्या भाविकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांमध्ये जागृतीकरण्यासाठी महापालिकेच्या घंटागाडीच्या ध्वनिक्षेपकावर ऑडियो क्लिप लावण्याचे स्पष्ट केले आहे. या मागणीचे निवेदन समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले आहे. 

 

कुंभमेळ्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने झाले आहे. यामध्ये अनेक भाविक बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कठिण परिस्थितीमध्ये कोरोनाची दुसरी लाट अजून गंभीर होऊ नये म्हणून महापालिकेने दक्षता घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post