जागतिक पुस्तक दिनी प्रा. सतीश शिर्के यांचा उपक्रम

जागतिक पुस्तक दिनी प्रा. सतीश शिर्के यांचा उपक्रम

 कोरोना रुग्ण, आरोग्य कर्मचारी व पोलिसांना पुस्तके भेट


। अहमदनगर । दि.24 एप्रिल ।  सध्या कोरोना महामारीचे संकट पसरले आहे सोशल मिडियाद्वारे  सगळीकडे नकारात्मक विचारांचा प्रसार झाला असून माणसाच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. अशा वातावरणात कोरोना रुग्णांना व त्यांच्या साठी जीवाची बाजी लावून सेवा देणाऱ्या  आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना पुस्तकभेट देऊन जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याचा आगळा- वेगळा उपक्रम येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील  प्रा. सतीश शिर्के यांनी राबविला आहे.
 

२३ एप्रिल हा जगप्रसिद्ध साहित्यिक सेक्सपियर यांचा जन्म व मृत्युदिन  असून हा दिवस  जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.  परंतु सध्या कोरोना संकटामुळे असे दिन साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. कोरोनाग्रस्तांचे मनोधैर्य वाढावे त्यांच्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचारी यांच्यात सकारत्मक ऊर्जा निर्माण व्हावी व ती पुस्तकातूनच प्राप्त होईल, इंटरनेट, मोबाईल च्या जमान्यात वाचनाकडे जणू पाठच फिरविली आहे. 

 

चांगले ऐकणे व वाचन करणे दुर्मिळ झाले आहे, अशी भावना प्रा. शिर्के यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी गुरू अर्जुन देव कोविड केअर सेंटर येथील कोरोनाग्रत तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक चौकात कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी, भरोसा सेल मधील पोलीस यांना स्वलिखित  'पालकांनो बालकांसाठी' हे पुस्तक भेट देण्यात आले.


'बुक नको बुके द्या' याचा प्रसार करत असून लेखन - वाचन विकास कार्यासाठी नेहमी  प्रयत्नशील असतात. प्रा. शिर्के यांची १५ पुस्तके प्रकाशित असून विविध वृत्तपत्रे, मासिके यामधून विपुल लेखन केले आहे. त्यांची यूट्यूब वर अनेक लोकप्रिय व्हिडिओ असून ते लेखक, वक़्ते व सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे उपक्रमशिल्  शिक्षक म्हणून परिचित असून त्यांच्या या उपक्रमा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post