। अहमदनगर । दि.25 एप्रिल । शहरातील कायमच्या रहदारीच्या ठिकाणी पानटपरीचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने आतील साडेसात हजार रुपये किंमतीचे दुकानातील साहित्य चोरुन नेले आहे.
ही घटना मंगळवारी दि.6 ते शनिवार दि.24 दरम्यान सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान माळीवाडा बसस्थानकाच्या मेन गेटसमोर जिल्हा परिषद कार्यालयाच्या गेटशेजारील टपरी येथे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नितीन विठ्ठल कुच्ची (वय 55, रा.ब्राह्मण गल्ली, पाचपीर चावडी, माळीवाडा) यांची माळीवाडा बसस्थानकाच्या गेटसमोर जिल्हा परिषद कार्यालयाच्या गेटशेजारी गणेश पाण सेंटर नावाचे दुकान आहे.
लॉकडानच्या कारनाने पानटपरी बंद असल्याचा अज्ञात चोरांनी गैरफायदा घेऊन पानटपरीचा पत्रा उचकटून आता प्रवेश केला. आतील सात हजार पाचशे रुपये किंमतीचे सिगारेट, तंबाखूचे बॉक्स, मसाला मटेरियल, सुपारी चॉकलेट यासह रोकड चोरुन नेली आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी नितीन हूच्चे यांच्या फिर्यादीवरुन भदवी कलम 461 अन्वये चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक नितीन गाडगे करीत आहेत.