महानगरपालिकेच्या दक्षता पथकाची कारवाई

। अहमदनगर । दि.23 एप्रिल । तारकपूर व सावेडी परिसरातील दुकानांवर व भाजी विक्रेत्यांवर आज महानगरपालिकेच्या दक्षता पथकातर्फे कारवाई करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाय करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी कोरोबाबत नियमावली जाहीर केलेली आहे. सकाळी सात ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. मात्र काही व्यापार्‍यांकडून ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात येत नाही.

त्यामुळे महानगरपालिकेच्या दक्षता पथकातर्फे आज सावेडीतील तारकपूर व पाईपलाईन रोडवरील अनेक दुकानांवर, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे पथकातील कर्मचार्‍यांनी दिली.

व्यापार्‍यांशी याबाबत चर्चा केली असता ठराविक व्यापार्‍यांवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात येत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. व्यापार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात सक्तीने पावती करण्यात येत असल्याबद्दलची नाराजी व्यापार्‍यांनी बोलून दाखविली.

याबाबत लवकरच अहमदनगरचे जिल्हाधिकारी व महापौर यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सावेडी व्यापारी असोसिएशनतर्फे देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post