। अहमदनगर । दि.15 एप्रिल । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु झालेला आहे. याबाबत काळाबाजार वाढलेल्या असल्याने प्रशासन सतर्क झाले असून कारवाई मोहिम सुरु केलेली आहे. भिंगारमधील डॉक्टरसह मेडिकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
डॉक्टर किशोर म्हस्के, डॉक्टर कौसल्या म्हस्के, प्रसाद अल्लाट, रोहित पवार यांच्यावर भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा आहे. कोरोना बाधित रुग्णांची नातेवाईक रेमडेसिविर मिळवण्यासाठी शहरासह जिल्ह्यामध्ये वणवण फिरत आहेत. प्रत्येक मेडिकल व हॉस्पिटल या ठिकाणी नातेवाईक रेमडेसिविर मिळेल का म्हणत फिरत आहेत.
अनेक हॉस्पिटल व मेडिकलमध्ये आजही रेमडेसिवीर वेळ मिळत नाही. मात्र काळ्याबाजारात दहा ते 15 हजारपर्यंत इंजेक्शन उपलब्ध होत आहे.
सोमवारी रात्री काल नऊ वाजल्याच्या सुमारास भिंगार पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी म्हस्के हॉस्पिटलच्या मेडिकल वरती व म्हस्के हॉस्पिटलवर पोलिसांनी कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी फूड अँड ड्रग अधिकार्यांना बोलवण्यात आले अधिकारी साधारण दहा ते अकरा वाजल्याच्या सुमारास पोलिस ठाण्याला आल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. मात्र त्यातील काही औषध परत देण्यात आली.
या कारवाईत सुमारे 24 ते 30 अशी रेमडेसिविरचे औषध पोलिसांनी कारवाईत जप्त केल्याची चर्चा सुरु आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून या कारवाईत 12 रेमडीशिवर दाखवण्यात आली आहेत, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाकडून ही चर्चा निर्थक असल्याचे स्पष्ट केले.
सोमवारी रात्री सुरू झालेली कारवाईचा गुन्हा मंगळवारी पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा भिंगार पोलीस ठाण्यात जावेद शेख यांच्या फिर्यादी वरून म्हस्के हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर म्हस्के डॉक्टर कौसल्या, म्हस्के प्रसाद अल्लाट आणि रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.