। मुंबई । दि.15 एप्रिल । राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. या लॉकडाऊनच्या काळात गोर गरिबांचे हाल होऊ नयेत याकरता त्यांच्यासाठी योजनाही राबवल्या आहेत. त्यानुसार, गरिबांना ३ रुपये दराने गहू आणि २ रुपये दराने तांदूळ मिळणार असून मोफत शिवभोजन थाळीही मिळणार आहे.
राज्यात अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये याकरता केंद्र सरकारने अन्नधान्या पुरवावे अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यावरून राज्यात आता चांगलेच राजकारण तापले आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रधानंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राज्याला अन्नधान्या पुरवण्याची मागणी केली आहे. तसेच, मागच्या लॉकडाऊनच्या काळात या योजनेचा राज्यातील लोकांना चांगला फायदा झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. मात्र, यावरून भाजपने आता राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
