। अहमदनगर । दि.28 एप्रिल । शेतजमिनीतील विहिरीवर बसवलेली दहा हजार रुपये किमतीची टेक्समो कंपनीचे पाच एच पी पॉवर ची इलेक्ट्रॉनिक मोटर कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेली ही घटना पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण शिवारातील गट नंबर 424 मधील हे जमिनीतील शेळके यांच्या विहिरीवर घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की विजय दत्तात्रय शेळके ( वय 40 राहणार वाडेगव्हाण तालुका पारनेर ) यांनी त्यांच्या वाडेगव्हाण शिवारातील गट नंबर 424 मधील शेतातील विहिरीत टेक्समो कंपनीची पाच एच पी पॉवरची इलेक्ट्रॉनिक मोटार बसवलेली होती. कोणीतरी अज्ञात चोराने ती मोटर चोरून नेली.
याप्रकरणी सुपा पोलिसांनी विजय शेळके यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे हे करीत आहेत.