मारहाण करून दागिने लुटले

। अहमदनगर । दि.28 एप्रिल । मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. व आतील महिलाच्या अंगावरील दागिने बळजबरीने हिसकावून चोरून घेतले. ही घटना नगर तालुका येथील गुंडेगाव येथे मंगळवारी ( दि.27 ) पहाटेच्या सुमारास घडली.


याबाबतची माहिती अशी की नारायण बाबुराव भापकर ( वय.48 राहणार गुंडेगाव] तालुका नगर) यांच्या घरी रात्री पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी येऊन घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा ऊचकाटला व आत प्रवेश करून नारायण भापकर यांची बहीण व त्यांची भावजई मंखाबाई यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 

 

व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, घरातील रोख रक्कम असा ऐवज मारहाण करून बळजबरीने चोरून नेला.याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी नारायण भापकर यांच्या फिर्यादीवरून भा द वि कलम 392. 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post