। अहमदनगर । दि.26 एप्रिल । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे की एमआयडीसी बंद केल्यास बर्याच गोष्टी ठप्प होतील. परंतु एमआयडीसीमध्ये नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे त्या संदर्भात नवीन प्रोटोकॉल बनवा, कामगारांची सुरक्षितता बाळगून काम कसे सुरू राहील असे नियम व अटी लागू करा, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकार्यांना दिले.
महसूल मंत्री थोरात यांनी आमदार डॉ. तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,
उपजिल्हाधिकारी संदीप निचित, तहसीलदार उमेश पाटील, या शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना प्रादुर्भावासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीमध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांनी एमआयडीसी मध्ये सर्वच कारखाने सुरू असल्याने नियमांचे बरेच ठिकाणी पालन होत नाहीय त्यामुळेच, रुग्ण संख्येत भर पडत आहे. हा मुद्दा उपस्थित केला होता.
यावेळी शहर काँग्रेसचे माजी. जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण , सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे, सेवादल काँग्रेसचे डॉ. मनोज लोंढे, डॉ. रिजवान अहमद, युवक काँग्रेसचे योगेश काळे आदी उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar.L