। संगमनेर । दि.25 एप्रिल । तालुक्यातील कोल्हेवाडीच्या करपडवस्ती येथील अरुण पांडुरंग वामन यांच्या गाईच्या गोठ्याची जाळीवर करून ३ बिबट्यांनी आत प्रवेश केला. हल्ला करून २ शेळ्या फस्त करत, एकीला जखमी केले.
हि घटना रविवारी पहाटे घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वामन यांचा घराशेजारी गायांचा गोठा आहे. या गोठ्यात शेळ्याही बांधल्या होत्या. रविवारी पहाटे ४ वाजता ३ बिबट्यांनी गोठ्याची जाळी वर करत शेळ्यांवर हल्ला चढवला.
२ शेळ्या ठार केल्या. तर एक जखमी झाली. जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजाने वामन परिवार जागा झाला. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबटे पसार झाले. वनमजूर संपत ढेरंगे यांनी घटनेचा पंचनामा केला. या परिसरात बिबट्यांनी लक्षणीय संख्या असून येथे वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली.