। अहमदनगर । दि.12 एप्रिल । जिल्हा परिषद शाळा स्तरावरील शिल्लक पोषण आहार खराब होऊ नये म्हणून तो विद्यार्थ्यांना वाटप करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी शुक्रवारी दिले.
शिक्षण समितीची ऑनलाइन सभा झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. जिल्हा परिषद शाळांचा पट वाढविण्यासाठी कुटुंब सर्वेक्षणात आढळलेल्या पालकांना दाखल करून घ्यावे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर गुणवत्ता यादीत जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत यासाठी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑनलाइन सभेत सदस्य राजेश परजणे, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, धनंजय गाढे, गणेश शेळके, उज्वला ठुबे, सुवर्णा जगताप आदी सहभागी झाले होते. सभेचे कामकाज प्राथमिक शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी पाहिले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
