दारू पिण्यास विरोध केल्याने सहा जणांकडून एकाच्या खुनाचा प्रयत्न

। अहमदनगर । दि.30 एप्रिल ।  दारू पिण्यावरून हटकून विरोध केल्याच्या कारणावरून सहा जणांनी एकास शिवीगाळ करीत काठी, गज, कुर्‍हाड, लाथाबुक्क्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथे घडली.

माहिती अशी की, तुळशीराम मोहन घनवट (वय 38 रा.खांडगाव तालुका श्रीगोंदा) यांच्या घरासमोर असलेल्या समाज मंदिरात सहा जण दररोज दारू पीत असत. घनवट यांनी त्यांना वारंवार तेथे दारू पिऊ नका असे सांगितले होते.

परंतु तरी ज्यांनी न ऐकता समाज मंदिरात दारू पिणे सुरु ठेवले होते. बुधवारी समाज मंदिरामध्ये दारू पिण्यासाठी बसले असताना घनवट यांनी येथे दारू पिऊ नका असे म्हणून टाकले याचा राग येऊन दारू पिण्यास बसलेले

हेमराज श्रीधर टकले, गणेश भालचंद्र पानसरे, महेश रावसाहेब टकले, सुनील पोपट टकले, सुरज मच्छिंद्र टकले, सचिन जवादे ( सर्व राहणार खांडगाव ) यांनी घनवट यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी काठी व गजाने मारहाण केली.

यातील सुनील टकले याने कुर्‍हाडीने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला व ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सपोनि पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post