। अहमदनगर । दि.16 एप्रिल । अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरच्या 9 हजार रुपये किंमतीच्या तीन बॅटर्या चोरीला गेल्या आहेत. तालुक्यातील वळण येथे बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान चोरीची ही घटना घडली.
बनकर यांनी या घटनेची फिर्याद राहुरी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीत म्हटले ट्रॅक्टर एमएच 17 सीएम 3679 ट्रॉलीसह वळण येथील आंबेडकर चौकात उभा केला होता.
या ट्रॅक्टरमधील 1 व ट्रॉलीमधील 2 बॅटर्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. राहुरी पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक डी. आर. चव्हाण करीत आहेत.
