। अहमदनगर । दि.16 एप्रिल । शाळेच्या ऑफिसच्या सेप्टी लॉक तोडून आतील दरवाजा उघडून अज्ञात चोराने शाळेतील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दोन संगणक, तीन इन्व्हर्टर बॅटरी, इन्वर्टर संच, प्रोजेक्टर, कुलर असे साहित्य चोरून नेले.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे घडली.
याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी कल्याण दादा होन ( रा.चांदे कसारे ता.कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास जमादार कुसारे हे करीत आहेत.
