। अहमदनगर । दि.11 एप्रिल । राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची कमतरता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करत 25 हजार पिशव्या रक्त संकलन करण्याचा निर्धार केल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.
तांबे म्हणाले, कोणतीही नैसर्गिक आपत्ती अथवा संकटकाळात युवक काँग्रेस नेहमी जनतेच्या सेवेत उभी राहिली आहे. राज्याला सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन केले जाणार आहे. मागील वर्षी युवक काँग्रेसच्या पुढाकारातुन 28500 रक्त पिशव्यांचे संकलन केले.
यंदाही शासन नियमांचे पालन करुन रक्तदान शिबीरे घेतली जातील, असे तांबे यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये युवक काँग्रेसने मदतकार्यात पन्नास लाखाहुन अधिक लोकांना अन्नधान्य व जेवण, मास्क आणि आर्सेनिक एल्बम औषधांचे वाटप तसेच कोरोना योध्यांचा सत्कार असे उपक्रम राबवले.