। अहमदनगर । दि.20 मार्च । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने दि.23 मार्चपर्यंत वाढ केली आहे.
सरकारी वकील व बोठे याच्या वकील यांच्यात झालेल्या युक्तिवादानंतर बोठे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहे.
रेखा जरे यांच्या हत्याकांडानंतर सुमारे सव्वातीन महिने फरार असलेल्या बोठेच्या मुसक्या गेल्या शनिवारी पोलिस पथकाने हैदराबाद येथून आवळल्या होत्या. न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला दि.20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती.
आज या कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा पारनेरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने 23 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
