कपाटातील सामानाची उचकापाचक करून ज्योतीबा वाडीत घरफोडी

। अहमदनगर । दि. 21  मार्च । किचनचा बंद दरवाजा धक्का देऊन अज्ञात चोरांनी उघडून आत प्रवेश केला. कपाटातील सामानाची उचकापाचक करून आतील 35 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा 48 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. 



ही घटना कर्जत तालुक्यातील ज्योतिबा वाडी येथे गुरुवारी ( दि. 18 )पहाटेच्या सुमारास घडली.  या बाबतची अधिक माहिती अशी की मोहन शेषराव काळुंगे ( वय 45 रा. ज्योतिबा वाडी कर्जत ) यांच्या घराच्या किचनच्या बंद दरवाजा अज्ञात चोरट्यांनी धक्का देऊन उघडला. 



आत प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक केली. व कपाटातील 48 हजार रुपये किमतीचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एवज चोरून गेला. याप्रकरणी पोलिसांनी मोहन काळुंगे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 457 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे अधिक तपास पोलीस नाईक दहिफळे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post