। अहमदनगर । दि. 19 । माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्यावर आज सायंकाळी नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीन वेळा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असूनही अंत्यसंस्कार शासकीय इतमामात का झाले नाहीत ? पोलिसांनी सलामीही का दिली नाही ? असा सवाल उपस्थित करीत गांधी यांच्या कन्या स्मिता अवसारीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नगरच्या अमरधाम मध्ये करण्यात आले. पोलिस आणि सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. तहसिलदार उमेश पाटील आणि उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, अंत्यसंस्कार सरकारी इतमात का केले नाहीत?
पोलिसांनी सलामी का दिली नाही ? असे प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. गांधी यांच्या कन्या नवसारीकर यांनी यावरून अधिकाऱ्यांच धारेवर धरले. मात्र, यासंबंधी वरिष्ठस्तरावरून आपल्या काहीही सूचना आल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
