रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

। अहमदनगर । दि.14 मार्च । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला हैदराबाद येथून अटक करण्यात आल्यानंतर आज त्याला 20 मार्चपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या खिशात एक सुसाईड नोटही सापडली असल्याचा खुलासा अहमदनगर पोलिसांनी केला आहे.


बाळ बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी हैदराबादेत पाच दिवसांचं सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासाठी पोलिसांनी एकूण 6 पथकं बनवली होती. या काळात बाळ बोठे 3 वेळा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. आरोपीने आपल्या फोन रात्री बंद केला होता.


पोलिसांनी हैदराबादेतील 5 हॉटेलमध्ये त्याचा शोध घेतला. पण अखेर तो 6 व्या हॉटेलमध्ये लपून बसल्याचं पोलिसांना आढळून आलं. दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


त्यात आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख आहे. त्याच बरोबर माझा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर कुणाला संपर्क करावा, याची माहिती त्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन केली. हैदाराबादमध्ये बाळ बोठे जिथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्या भागात ही पथकं पाठवण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला.

Post a Comment

Previous Post Next Post