रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

। अहमदनगर । दि. 21  मार्च । भरधाव वेगातील रिक्षाने मोटार सायकल ला धडक दिली. या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना नगर पाथर्डी रोड वरील बेलेश्वर चौक भिंगार येथे मंगळवारी ( दि. १६ ) सकाळी दहा वाजता घडली.


याबाबतची माहिती अशी की श्रीकृष्ण मल्‍हारी घाडगे ( वय ७० रा. नागरदेवळे ) हे त्यांच्या मोटरसायकल ( क्र. एम एच १६ बी सी  ०८२३ ) वरून जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाने ( क्र. एम एच १६ बीसी ०६६२ ) त्यांना धडक दिली या धडकेत धाडगे जखमी झाले. अपघात होताच रिक्षा चालक घटनास्थळावरून पसार झाला


याप्रकरणी पोलिसांनी घाडगे यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक साठी हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post