ट्रकच्या धडकेमध्ये वृध्द महिला ठार

। अहमदनगर । दि. 21  मार्च । भरधाव वेगातील ट्रकने पुढे चाललेल्या मोटर सायकल ला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत मोटरसायकल वरील 60  वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर मनमाड रोड वरील बोधेगाव येथील गुलशन पार्क जवळ गणेश चौक येथे शुक्रवारी ( दि.19 ) बारा वाजता घडली.



याबाबतची अधिक माहिती अशी की संजय बबन परदेशी ( वय 40 रा. गणेश चौक गुलशन पार्क बोल्हेगाव ) त्यांची मावशी नर्मदा पंढरीनाथ शिनगारे ( वय 60) यांना घेऊन मोटरसायकलवरून जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या ट्रकने ( क्र.टी एन 52 जे 1768 )  पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत नर्मदा शिंगारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय परदेशी हे जखमी झाले. 



याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post