। अहमदनगर । दि. 17 । खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनीही केंद्रीय मंत्री मा, खासदार दिलीप गांधी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, आपल्या शोक संदेशात त्यांनी म्हटले आहे की, मा.खासदार दिलीप गांधी यांची भारतीय जनता पक्षातील वाटचाल ही माझ्यासाठी मार्गदर्शक होती.
या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील प्रश्नांसाठी त्यांचे मार्गदर्शन मला सातत्याने मिळत होते. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये त्यांनी दिलेले योगदान हे सर्वांनाच प्रेरणादायी होते. माझ्या लोकसभा निवडणूकीतील विजयात दिलीप गांधी यांनी दिलेली साथ ही सदैव स्मरणात राहाणार असल्याचे खा.विखे पाटील म्हणाले.
Tags:
Ahmednagar
