। अहमदनगर । दि.04 मार्च । पंधरा लाख रुपयांची खंडणी मागणार्या दोघांना पकडन्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहेत. कुलदीप रुपचंद कासार व अशोक उर्फ सोनू गुंड अशी पकडण्यात आलेल्या आरोपीची नांवे आहेत.
कुलदीप कासार,सोनू गुंड व त्यांच्या साथीदारांनी वेळोवेळी फोनवरून तसेच समक्ष येऊन धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी केली खंडणी न दिल्यास घरातील सर्वाना उचलून नेऊन ठार मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी भा द वि कलम 384 ,386, 120 ( अ ) प्रमाणे खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली.
गुन्हा दाखल झालेपासून कुलदीप व सोनू पसार झाले होते ते पोलिसांना मिळून येत नव्हते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कुलदीप कासार व सोनू गुंड यांना अटक केली. पोलिसांनी यापूर्वीच विश्वजित रमेश कासार व मयूर बापूसाहेब नाईक यांना अटक केली आहे.ते दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
