अरविंद जोसेफ कांबळे (22, शहरटाकळी, ता. शेवगाव), बापू चंद्रभान चव्हाण (27, शहरटाकळी, ता. शेवगाव) व समीर बबन सय्यद (27, आंत्रे, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
रिक्षामधील प्रवासी एसटीमध्ये घेतल्याचा राग आल्याने आरोपींनी महिला कंडक्टर प्रमिला पालवे यांना दमदाटी व शिवीगाळ केली. ही घटना 18 जून 2014 रोजी भातकुडगाव शिवारात घडली होती.
याप्रकरणी पालवे यांच्या फियादीवरून शेवगाव पोलिसांनी आरोपींच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादीसह इतर साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयासमोर आलेले साक्षीपुरावे, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीशांनी आरोपींना एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी. के. मुसळे यांनी काम पाहिले. सहायक फौजदार ए. के. भोसले यांनी सहकार्य केले.
