। अहमदनगर । दि.14 मार्च । | महाशिवरात्रीचे दिवशी रात्री दोन अनोळखी चोरट्यांनी कोपरगाव तालुक्यातील कासली गोधेगाव रोड येथील घरात प्रवेश करून दीड ग्रॅमचे मंगळसूत्र चोरून नेले. २४ तासांच्या आत आरोपीला पकडण्यात यश मिळाले.
त्यास कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे उभे केले असता त्यास १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. ११ मार्च रोजी रात्री अशोक मारुती रांधवणे हे आई-पत्नीसह फराळ करत असता दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
त्यांना चाकूचा धाक दाखवून अशोक रांधवणे यांच्या पत्नीच्या गळ्यातील ६००० रुपये किंमतीचे दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध गोधेगाव शिवारात सुरू केली.
