ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी महसुलाची गरज
वीज देयकाची थकबाकी भरून ग्राहकांनी सहकार्य करावे
कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे आवाहन
। अहमदनगर । दि.16 मार्च । वीज ही अत्यावश्यक सेवा असून, कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा देण्यासाठी कार्यरत होते, मात्र ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा न केल्यामुळे प्रचंड थकबाकीचा डोंगर उभा झाला आहे, त्यामुळे भविष्यात अशाच प्रकारे कायम अखंडित सेवा देण्यासाठी व वीज खरेदीसाठी महसुलाची गरज असून त्यामुळे ग्राहकांना दिलेल्या प्रत्येक युनिटची रक्कम वसुली करावी असे आवाहन महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा मुख्यालयाचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी केले.
मंगळवारी नाशिक परिमंडळ कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळाचा विषयनिहाय विविध कार्याचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
नाशिक परिमंडळात मागील वर्षभरापासून अनेक ग्राहकांनी एकही वीज बिल भरलेले नसून यामध्ये काही विभागाची कार्यालयाची वसुली अत्यंत असमाधानकारक असून सर्वांनी देयक वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात राबवून थकबाकीदार ग्राहकांना वीज देयकाची रक्कम भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा तसेच ग्राहकांनी सुद्धा देयके भरून सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
यासोबतच कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत नवीन कृषी वीज जोडणी व थकबाकीतून मुक्त करण्यासाठी या योनेचा प्रसार करण्याचे सांगितले. कामात कुचराई व बेजवाबदारपणा करणार्या अभियंते व कर्मचार्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रसाद रेशमे यांनी दिला. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दैनंदिन ग्राहक सेवेसोबत परीमंडळाची थकबाकी शुन्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
बैठकीला अधिक्षक अभियंते प्रविण दरोली, रमेश सानप व संतोष सांगळे तसेच कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, धनंजय दीक्षित, माणिकलाल तपासे, सतीश बोन्डे, जयंतीलाल भामरे, राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड, संजय तडवी, सुरेंद्रनाथ भोये, अनिल थोरात, दत्तात्रय गोसावी, मनीषकुमार सूर्यवंशी, सहाय्यक महाव्यवस्थापक राजा बोढारे, प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनवणे, वरिष्ठ व्यवस्थापक(विवले) दिनकर मंडलिक आणि जनसंपर्क अधिकारी विकास आढे आदी अधिकारी प्रत्यक्ष तथा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
एकलहरे येथे गॅस इन्सुलेटेड असलेले उपकेंद्र पायाभूत आराखडा विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आले असून त्याची पाहणी कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी केली व जिल्ह्यातील एकमेव गॅस बेस तंत्रज्ञानावर उभारले असून हे तात्काळ सुरु करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. यावेळी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक सुंदर लटपटे,अधीक्षक अभियंता संजय खंडारे आणि प्रवीण दरोली, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
