केदारेश्वरच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ४००० रुपये तातडीची आर्थिक मदत जाहीर

लाडजळगाव गोळेगाव गारपीटग्रस्त 

परिसरात प्रतापराव ढाकणे यांनी केली पाहणी 

 

 
। बोधेगाव  । दि.20 मार्च ।  शेवगाव तालुक्यासह पूर्व भागातील लाडजळगाव गोळेगाव, शेकटे खुर्द, शेकटे बुद्रुक, सुकळी, बोधेगाव व आणि पंचक्रोशीत शनिवार वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. पर्जंन्यवृष्टी सुरु असतानाच प्रचंड गारांचा वर्षाव झाला आहे.क्षणार्धात सर्व परिसर पांढरा शुभ्र गारमय झाला होता.सगळीकडे पाणीच पाणी झाले .या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला खरा परंतु बळीराजावर अचानक आस्मानी संकट कोसाळल्यामुळे आणि हाती आलेला घास निसर्गाने हिराऊन घेतल्यामुळे बळीराजा अत्यंत चिंताग्रस्त झाला आहे.
 
शेतातील काढणीला आलेला  गहु,हरभरा,मका,तसेच ऊन्हाळी पिके कांदा, बाजरी भूईमुग उभा ऊस आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍याला वर्षभर कोरोनाने छळले आणि आता हाता—तोंडाशी आलेला घास अस्ममानी संकटाने हिराऊन नेला .शेतकर्‍यांनी कर्ज काढुन आपल्या शेतीत गहु, हरभरा, मका, बाजरी कांदा, व  फळबागांचे पिके घेतली होती .ती सर्व पिके काही वेळात भूईसपाट झाली त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.आई खाऊ देईना व बाप भिक मागु देईना अशी स्थिती शेतकर्‍याची झाली आहे.
 
शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई सर्व शेतर्‍यांना दिली पाहिजे अशी मागणी लाडजळगाव येथील प्रगतशिल शेतकरीमाजी सरपंच काकासाहेब तहकिक यांनी यावेळी केली आहे. श्री केदारेश्वर कारखान्याच्या  कार्यक्षेत्रांतील सभासद असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी ४००० रुपये तातडीने आर्थिक मदत देण्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी पाहणी दौऱ्यात जाहीर केले 

Post a Comment

Previous Post Next Post