। मुंबई । दि.02 मार्च । राज्यात अवैध रेती उत्खनन प्रतिबंध करण्यासाठी तहसील व उपविभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली असून या पथकामार्फत मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील अवैध रेती उत्खनन रोखण्याबाबत विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असून त्याबाबत महसूलमंत्री, गृहमंत्री व विरोधी पक्षनेते यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करणार असल्याचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी सांगितले.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य शशिकांत शिंदे, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.