। अहमदनगर । दि.22 मार्च । एकीकडे कोरोना सारख्या संकटा पासुन स्वतःचा बचाव करत बातमीदारी करणाऱ्या प्रतिनिधींचा उन्हापासुन देखील बचाव व्हावा या हेतूने अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने शहरातील मीडिया प्रतिनिधींना टोपी वाटप करण्यात आले आहे.
२०२१ या वर्षीच्या मे महिन्यांच्या उन्हाचा तडाखा लांब असतांना देखील मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा बसत आहे. मात्र अश्या परस्तीथीत देखील मीडिया प्रतिनिधी हे शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट, माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवीण्यासाठी मेहनत घेत असतात.
त्यामुळेच उन्हाच्या झळांपासून संरक्षण व्हावे. यासाठी अहमदनगर शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडियातील प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने टोप्या वाटप करण्यात आले आहे.
उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक असते. भरदुपारी कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत असतात. मे महिन्यात येणारी उष्णता मार्च महिन्यातच जाणवू लागल्याने. मार्च मध्येच ही स्थिती असुन मे महिन्याचा तडाखा कसा असेल ही चिंता करणारी बाब आहे
त्यामुळे मीडिया प्रतिनिधींना घराबाहेर पडताना उन्हापासून आपले संरक्षण करता यावे या हेतूनेच मीडिया प्रतिनिधीनां टोपी वाटप करण्यात आली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद यांनी दिली.
कोरोनां रुग्णांनाचे आकडे शहरासह जिल्ह्यात दररोज वाढत आहे. त्यातून स्वतःचा बचाव करत असतांना उन्हापासुन देखील स्वतःच बचाव व्हावा हा या टोप्या वाटपाचा मुख्य हेतू होता. दरम्यान टोपी वाटप कार्यक्रमाप्रसंगी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष उमेर सय्यद, कुणाल जायकर, लैलेश बारगजे, रोहित वाळके, निखिल चौकर, सुशील थोरात, सागर दूस्सल, सचिन अग्रवाल, महेंद्र पाठक, आमीर सय्यद, मोहसीन कुरैशी यांच्यासह आदी सदस्य उपस्थित होते
