। अहमदनगर । दि.01 मार्च । रेल्वे स्टेशन, पं.स.समोरील रहिवासी राजेंद्र गोपाळराव शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 55 वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्व.राजेंद्र शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. सामाजिक कार्यात ते नेहमीच सहभागी असत. रंगतरंग तारे या वाद्यवृंदाचे संचालक होते. प्रसिद्ध निवेदक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या अकास्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags:
Ahmednagar