कारमध्ये डिझेल भरुन दोघे पैसे न देता पसार

। अहमदनगर  । दि.25 मार्च । येथील पेट्रोल पंपावर कारमध्ये 5 हजार रुपयांचे सुमारे 56 लिटर डिझेल भरुन धेतले व यानंतर दोघांनी पैसे न देताच येथून पसार झाले आहेत.

ही घटना बुधवारी (दि.24) पहाटे 5.30 च्या सुमारास नगर-औरंगाबाद रोडवरील अकबर नगर परिसरातील डीएसएम रिलायन्स पेट्रोल पंपावर घडली आहे.

माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील गोविंद रंगनाथ आंधळे व ज्ञानदेव सुरेश गर्जे हे बुधवारी पहाटे अकबर नगर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपावर स्विफ्ट कार घेऊन आले.

त्यांनी पंपावरील कर्मचार्‍याकडून कारमध्ये 5 हजाराचे डिझेल टाकले व पैसे न देताच कार घेवून पोबारा केला. यावेळी त्यांनी कारची नंबर प्लेटही बनावट लावलेली होती.

याप्रकरणी पेट्रोल पांपावरील कर्मचारी कमलाकर सोमनाथ लाड (वय 22, रा.नवलेनगर, गुलमोहोर रोड) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध भा.दं. वि.क. 379, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post