कला केंद्रावर तलवारीचा धाक दाखवून रोकड घेऊन जमावाकडून वाहनांची तोडफोड

। अहमदनगर । दि.25 मार्च । सहा अनोळखी इसमाने तलवारीचा धाक दाखवून 12 हजार 500 रुपये बळजबरीने घेऊन वाहनांची तोडफोड केली.

ही घटना नगर तालुक्यातील नांदगाव येथील भगवती कला केंद्र येथे गुरुवारी (दि.25 ) रात्री 1.30 घडली याबाबतची अधिक माहिती अशी की नांदगाव येथील भगवती कला केंद्रावर

सहा अनोळखी इसम तलवार घेऊन आले त्यांनी तलवारीची धार दाखवून बारा हजार पाचशे रुपये बळजबरीने घेतले.  आणि कलाकेंद्राच्या परिसरात असलेल्या आठ ते नऊ मोटर सायकल व एक चार चाकी वाहन त्यांची तोडफोड केली.

आणी पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सतीश महेश काळे ( वय-28 रा. वाळवणे ता. पारनेर ) यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 395, 397,427  प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post