। अहमदनगर । दि.02 मार्च । वाघ मळा करंदीकर हॉस्पिटलच्या मागील घरातील गोदरेजच्या कपाटामधून 1 लाख 54 हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले.
माहिती अशी की, पुनम दिपक घाडगे (रा.वाघमळा, करंदीकर हॉस्पिटल,नगर) ह्या राहत असलेल्या घरामधील लग्नाचे तसेच त्यांच्या आईचे असे सुमारे 1 लाख 54 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घाडगे यांच्या घरातील कपाटामधून चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना दि.25 ते 27 फेब्रुवारीच्या दरम्यान घडली आहे.
या बाबत पुनम दिपक घाडगे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात भादवि कलम 457, 280 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास समाधान सोळुंके हे करीत आहे.