। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी । जिल्हा बँकेच्या 4 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये यामध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना कप बशी चे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हाची जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.
जिल्हा बँकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर, उर्वरीत चार जागांसाठी 18 फेब्रुवारीला मतदान होत आहे.
या चार जागांमध्ये कर्जत मतदार संघात अंबादास पिसाळ विरुद्ध मिनाक्षी साळुंके, नगर मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले विरुद्ध सत्यभामाबाई बेरड, पारनेर मतदारसंघात उदय शेळके विरुद्ध रामदास भोसले तर बिगर शेती संस्थाच्या मतदार संघात प्रशांत गायकवाड विरुद्ध दत्तात्रय पानसरे यांच्यामध्ये लढत होत आहे.
या सर्वांचे चिन्ह वाटप शुक्रवारी करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्डिले यांना कपबशी हे चिन्ह देण्यात आले आहे.
असे झाले चिन्ह वाटप :
कर्जत मतदारसंघ : अंबादास पिसाळ - विमान, मिनाक्षी सांळुके - कपबशी.
नगर मतदारसंघ : शिवाजी कर्डिले - कपबशी, सत्यभामाबाई बेरड - छत्री.
पारनेर मतदारसंघ : रामदास भोसले - विमान, उदय शेळके - कपबशी.
बिगर शेती संस्थाचा मतदार संघ : प्रशांत गायकवाड - कपबशी, दत्तात्रय पानसरे - विमान.
