सक्तीची वीजबील वसुली थांबवून वीजबीले माफ करा: संभाजी दहातोंडे

। अहमदनगर । दि.15 फेब्रुवारी । नगर जिल्ह्यासह राज्यात सध्या महावितरण शेतकर्‍यांकडून सक्तीने वीजबील वसुल करत आहे. मुळात अनेक संकटाने पिचलेल्या शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे सक्तीची वीजबील वसुली थांबवून शेतकर्‍यांची वीजबीले माफ करावी अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. वीजबीलाबाबत शेतकर्‍यांची पिळवणूक थांबली नाही तर अंदोलन शेतकरी मराठा महासंघ अंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.


शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, युवक अध्यक्ष संतोष नानवटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना, अतीवृष्टी आणि इतर संकटामुळे शेतकरी हतबल आहे. सतत शेतीला फटका बसत असल्याने शेतकऱी आर्थिक संकटात आहे. अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान अजूनही अनेक शेतकर्‍यांना मिळाले नाही. असे असताना महावितरणने मात्र थकलेल्या वीजबीलाची शेतकर्‍यांकडून सक्तीने वसुली सुरु केली आहे.


विशेष म्हणजे केवळ एका शेतकर्‍याची वीज न तोडता चक्क ट्रान्सफार्मर बंद करण्याची निती अवलंंवली जात आहे आणि याचे वितरणचे अधिकारी आणि मंत्रीही समर्थन करत आहेत. मुळात संकटात असलेल्या शेतकर्‍यांची ही पिळवणूक आहे. सध्या रब्बीच्या पिकांना पाणी देण्याचा काळ असताना अशा प्रकारे वीज बंद करुन अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना खिंडीत गाठण्याचा हा प्रकार आहे. हे प्रकार सरकारी पातळीवर तातडीने थांबवावे. वसुली तर थांबलीच पाहिजे, परंतू शेतकर्‍यांची थकीत बीले माफ करावीत अशी आमची मागणी आहे. बाबत दखल घेतली नाही तर शेतकरी मराठा महासंघ राज्यभर अंदोलन उभारेल.

Post a Comment

Previous Post Next Post