कालव्यात युवकाचा मृतदेह सापडला

। अहमदनगर । दि.15 फेब्रुवारी । श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रँच रोडवरील अक्षय काॅर्नर परिसरातील कालव्यात रविवारी जुनेद झाकिर पटेल (३०, मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळला.

नागरिकांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. शहर पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. 

त्यावेळी मृत तरुणाच्या खिशात मतदान कार्ड, मोबाइलसह काही पैसे होते. याप्रकरणी शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जुनेदच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post