जिल्ह्यात आज ७२ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

आतापर्यंत ७१ हजार २७१ 

रुग्ण बरे होऊन परतले घरी 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९४ टक्के

आज ७८ रूग्णांना डिस्चार्ज तर

 ७२ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर


। अहमदनगर । दि.13 फेब्रुवारी । जिल्ह्यात आज  ७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार २७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११३५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९ आणि अँटीजेन चाचणीत १६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०२, संगमनेर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पारनेर ०३, राहता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०७, शेवगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १६ जण बाधित आढळुन आले. मनपा ०८, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०३, पाथर्डी ०१, राहुरी ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११, जामखेड ०४, कर्जत ०२, नगर ग्रामीण ११, पारनेर ०९, पाथर्डी ०४, राहाता ०५, संगमनेर १८, शेवगाव ०१, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


* बरे झालेली रुग्ण संख्या : ७१२७१

* उपचार सुरू असलेले रूग्ण : ११३५

* मृत्यू : १११५

* एकूण रूग्ण संख्या : ७३५२१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक १३ फेब्रुवारी, २०२१, सायं.६ वा 

Post a Comment

Previous Post Next Post