मानसा वाराणसीच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज

। मुंबई । दि.12 फेब्रुवारी । तेलंगणाच्या मानसा वाराणसीने मिस इंडिया 2020चा किताब पटवला आहे. मुंबईत बुधवारी रात्री मिस इंडिया 2020च्या ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते. टॉप 3 मध्ये मिस इंडिया 2020चा किताब मानसा वाराणसीला मिळाला. तर मिस इंडिया वर्ल्ड 2020 किताब मान सिंहला देण्यात आला. 

 

तर फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप मनिका शोकंद बनली. बुधवारी रात्री मुंबईच्या हयात रिजेंसी हॉटेलमध्ये ‘मिस इंडिया 2020’चा फिनाले रंगला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ही स्पर्धा पूर्णपणे डिजिटल रूपात पार पडली. कोरोना महामारीमुळे मिस इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेच्या पूर्ण प्रक्रियेला डिजीटल रुपात आयोजित करण्यात आले होते. हे मिस इंडिया 2020चे 57वे आयोजन होते. यादरम्यान मानसा वाराणसी, मान सिंह, मनिका शोकंद एकमेकींसोबत आपल्या विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसून आल्या.

 

तसेच मिस इंडिया 2020च्या दिमाखदार फिनालेचे होस्टिंग अभिनेता अपारशक्ती खुरानाने केले. तर अभिनेत्री चित्रांगदा सिंहही या फिनालेला उपस्थित होती. दरम्यान, मिस इंडिया 2020 बनलेली मानसा वाराणसी ही 23 वर्षांची आहे. यापूर्वी तिने मिस तेलंगणा हा किताबही आपल्या नावावर केला आहे.


पेशाने ती फायनान्शिअल एक्सचेंज इन्फॉर्मेशन अ‍ॅनालिस्ट आहे. वाचन, गाणी ऐकणे, डान्स आणि योगा हे तिचे छंद आहेत.  कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करणा-या मानसाने 8 वर्षे भरतनाट्यम शिकले आहे. चार वर्षे संगीताचे धडे गिरवले आहेत. खुशी मिश्रा, मान्या सिंह, मानसा, रती हुलजी आणि मणिका शोकंद या फेमिना मिस इंडियाच्या टॉप ५ फायनलिस्ट होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post