रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात जाताना पकडला

नगर तालुका पोलिसांची कारवाई 

। अहमदनगर ।  दि.20  फेब्रुवारी ।  रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजाराचा आहे, हे माहिती असून त्याचा अनोळखी साथीदारांसह साठा करून ट्रक ने वाहतूक करत असताना नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी ( दि.16) रात्री 4 वा. तांदूळाचा ट्रक पकडण्यात आला. यामध्ये नगर तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.


यामध्ये गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे (दोघे रा.कलांडी ता निलगा जि. लातूर) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार नगर तालुका पोलिसांनी केली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील अरणगाव बायपास येथे मंगळवारी ( दि.16) रात्री 4 वा. रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजाराचा आहे, हे माहिती असूनही गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे व त्याचा अनोळखी साथीदारांसह साठा करून ट्रक ने वाहतूक करत असताना नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी ( दि.16) राञी 4 वा. पकडण्यात आला.


या कारवाईत 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक व 7 लाख रुपयांचा तांदूळ असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार नगर तालुका पोलिसांनी केली.


पोलिसांनी या कारवाईत वाघमारे व घोरपडे या दोघांना अटक केली असून, त्यांच्याविरुध्द भादवी कलम 420,465,,467,468,34.जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post