जिल्हा बँक निवडणुकीत नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई : दिग्विजय आहेर

निवडणुक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांची माहिती


। अहमदनगर ।  दि.20  फेब्रुवारी ।  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक आज शनिवार (दि.20) रोजी होत आहे. यासाठी प्रत्येक मतदाराने केलेल्या मतदानाची गोपनियता कायम राहण्यासाठी मतदान केंद्रावर मोबाईल अथवा कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक उपकरण घेवुन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सदर बाबीचे उल्लंघन केल्या कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विनामास्क प्रवेश दिला जाणार नसल्याची  माहिती निवडणुक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली.


जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि.20) रोजी सकाळी 8 ते दु.4 वाजेपर्यंत मतदान हे 14 तालुक्यात घेण्यात येणार आहे. नगर, पारनेर व कर्जत या तीन तालुक्यात वि.का.सेवा मतदार संघाचे मतदान व बिगर शेती मतदार संघाचे मतदान घेण्यात येत असून उर्वरीत 11 तालुक्यात फक्त बिगर शेती मतदार संघाचे मतदार घेण्यात येणार आहे.


मतदान प्रक्रिया पार पाडण्यासठी सहकार खात्यातील 85 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात अलेली आहे. सदर निवडणुकीसाठी प्रत्येक मतदार केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे पोलिस अधिक्षक यांनी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक केलेली आहे.


मतदानाच्या वेळी कोरोना पार्श्‍वभुमीवर प्रत्येक केंद्रावर थर्मल मिटर व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सोशल डिस्टसींग राहील या बाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान करणेस जातांना प्रत्येक मतदारांनी मास्क लावणे आवश्यक आहे. मास्क लावलेले असेल त्यांनाच मतदान केंद्रावर प्रवेश करता येणार आहे.


ही निवडणुक  भयमुक्त व निपक्षपातीपणे तसेच कोरोणाच्या पार्श्‍वभुमीवर आवश्यक ती खबदारी घेवुन उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदान व मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी सहकार विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी सर्व उपायोजना केल्या असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी आहेर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.



रविवार दि.21 रोजी मतमोजणी

सिलबंद पेट्या ठेवण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात स्ट्राँग रुम तयार करण्यात आला आहे. येथे सी.सी.टी.व्ही कॅमरा बसवण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवार दि.21 सकाळी 9 वाजता मतमोजणी ही निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. सात टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी 20 अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिग्विजय आहेर

निवडणुक निर्णय अधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post