। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । महापालिकेचे नुतन आयुक्त शंकर गोरे यांनी आज (गुरुवारी) पदभार स्वीकारला.
आयुक्त श्रीकांत मायकलवार निवृत्त झाल्याने पदाचा कार्यभार सध्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे होता. अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
याप्रसंगी उपआयुक्त यशवंत डांगे, उप आयुक्त डॉ.प्रदीप पठारे , सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, दिनेश सिनारे, सचिन राऊत, उद्यान निरिक्षक शशिकांत नजन आदी उपस्थित होते.