‘महावितरण’ने सक्तीची वसुली थांबवावी : सुमित वर्मा

मनसे विद्यार्थी सेनेचे अधिक्षक अभियंत्यांना निवेदन 


। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी । महावितरण सध्या ‘वसुली भाईगिरी’ करुन सक्तीची वीज बिले वसूल करत आहे, ती तात्काळ थांबवावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, सनी वैराळ, प्रमोद ठाकूर, आदेश गायकवाड, बजरंग रणसिंग, संतोष गवते, शुभम काळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.


अधिक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचे 3 ते 4 महिने सर्वकाही बंद असतांना ज्यांचे रोजच्या कामाईवर सर्वकाही अवलंबून असते. अशा लोकांना त्यांचे व्यवसायिक, घरगुती लाईटबील अव्वाच्या सव्वा आलेले आहेत. 

 

क्लासेस, नर्सरी, प्ले ग्रुप सारख्यांचे तर अजूनही सर्व वर्ग बंद आहेत. पण आपल्या कर्मचार्‍यांकडून बळजबरीने वीज बील वसूली करण्यात येत आहे. यातून मार्ग काढण्याबाबत कोणतेही पाऊल आपल्या कार्यालयाकडून उचलले गेल्याचे दिसत नाही. उर्जामंत्री खोटे आश्‍वासन देऊन जनतेची दिशाभूल करतात, पण सर्वसामान्य जनतेचा विचार कोणीही करतांना दिसत नाही.


ज्या लोकांना खोटी वीज बिले दिली, अंदाजे बीले दिली, त्यांना दुरुस्तीसाठी रक्कम भरायला लावणे ,त्यात  जे सावकरी व्याज लावत आहेत, त्यावर मनसेचा आक्षेप आहे. लोकांना लॉकडाऊनच्या झळा असूजही बसत आहेत, त्या तीन महिन्यांची नुकसान भरपाई होणार तर नाहीये पण त्याचा नहाक त्रास सहन करावा लागत आहे. आपण तात्काळ ही ‘तोडा-तोडी’ थांबवावी. 

 

जनतेला या त्रासातून मुक्त करावे अन्यथा येत्या आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आपल्या कार्यालयावर ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर होणार्‍या गोष्टींना तुम्ही स्वत: जबाबदार असाल  असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post