निबंध स्पर्धेत अक्षता वडवणीकर १० हजार रूपये प्रथम बक्षिसाची मानकरी

। अहमदनगर ।  दि.11  फेब्रुवारी । देशातील प्रसिध्द पुणेस्थित मार्गी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र हे युपीएससी एमपीएससी परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांमधे लेेखन कौशल्य विकसित व्हावे, त्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून मार्गी तर्फे निबंध स्पर्धा आयोजित केली गेली होती.

 

या स्पर्धेचे 'स्त्री जन्म म्हणुनि न व्हावे उदास, कायदाः गरिबांचा व श्रीमंतांचा, साथीचे आजार व मानसिक आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोन व भारतीय समाज, बखर प्रशासनाची, माझा श्वास गुदमरतोय! (I Can't Breath) असे' विषय होते.

 

नुकताच या स्पर्धेचा निकाल संस्थेतर्फे जाहीर करण्यात आला. त्यात अहमदनगरमधील विद्यार्थीनी अक्षता दत्तात्रय वडवणीकर हिस प्रथम क्रमांकाचे १० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर झाले. तर द्वितीय क्रमांकाचे ७ हजार रूपये रकमेचे पारितोषिक रायगडच्या अनुजा जैतपाल यांना जाहीर झाले. अक्षता हिच्या ' स्त्री जन्म म्हणुनि न व्हावे उदास' या निबंधास तर अनुजा हिच्या 'माझा श्वास गुदमरतोय!' या निबंधास हे पारितोषिक जाहीर झाले.

 

अक्षता वडवणीकर हिचे मराठा सेवा संघाचे माजी शहराध्यक्ष इंजी. अभिजीत एकनाथ वाघ, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष असिफखान दुलेखान, आर्टलाईनचे सय्यद समी, कामगार संघटना महासंघाचे कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, उर्जिता फौंडेशनच्या संध्याताई मेढे, रहेमत सुलतान फोंडेशनचे युनुसभाई तांबटकर, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे भैरवनाथ वाकळे, किसान सभेचे विजय केदारे, संतोष गायकवाड यांनी विशेष अभिनंदन केले.

 

स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना e- प्रमाणपत्र देण्यात येईल आणि विजेत्या स्पर्धकांचे निबंध लवकरच सर्वांना वाचण्यासाठी 'मार्गी टेलिग्राम चॅनल' t.me/margeeupscmpsc वर अपलोड केले जातील. असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post