। अहमदनगर । दि.11 फेब्रुवारी । येथील सावेडी परिसरातील झोपडी कॅन्टीन भागातील लता प्रकाश सुपेकर यांचे शनिवार दि.6 रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्या 62 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर नालेगांव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. स्व.लताबाई सुपेकर यांच्या पश्चात पती उद्योजक प्रकाश सुपेकर मुले अमित व योगेश, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
स्व.लताबाई सुपेकर या अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष उत्तमराव सुपेकर यांच्या स्नुषा तर ना.राजेश टोपे यांच्या आत्या होत. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या, त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags:
Ahmednagar